संगीत जयदेव..
ज्येष्ठ संवादिनी वादक, संगीतकार आणि साहित्यिक पं. गोविंदराव टेंबे यांच्या जन्म शताब्दी निमित्त त्यांनी पन्नास वर्षापू्वी लिहीलेल्या गीत गोविंदकार..कवी जयदेव यांच्या जीवनावर आधारित स्वरनाट्य.. संगीत जयदेव या संगितीकेचा बैठा प्रयोग पुण्यात सादर झाला.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सहयोगाने ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यार्थी वर्गाने सादर केलेली चार अंकाची संगीतिका..
संगीत जयदेव..
लेखन आणि संगीत.. स्व. गोविंदराव टेंबे..
संगीत मार्गदर्शन.. पं. सुधीर पोटे
संयोजन.. डॉ. केशवचैतन्य कुंटे
त्यात..
होनराज मावळे, अबोली देशपांडे, तेजस मिस्त्री, अभिषेक शिंदे, आशिष कदम, किर्ती धर्माधिकारी, ज्ञानेश्वरी पंडित,मृद्गांधा कड, ओंकार लोहार, श्रीनिवास केंचे, पार्थ कुलकर्णी..या गायक कलावंतांचा सहभाग होता.
थोडा इतिहास..
हे स्वरनाट्य १९५४ साली आकाशवाणीवर प्रथम सादर झाले होते. १९६२ मध्ये त्याचा नाट्यप्रयोग कोल्हापुरात सादर झाला. त्यानंतर १९७३..७४ साली याचे प्रयोग झाले... त्यानंतर त्याचा आविष्कार झाला नाही.
१९७४ साली यात जयदेव यांचे काम करणारे पंडित सुधीर पोटे यांच्या ते नाट्य पाठ आहे..त्यांनीच ते पुण्यात येऊन ललित कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे धडे दिले.
२०२१ मध्ये त्याची विशेष कार्यशाळा ललित केंद्रांत आयोजित केली होती. तेंव्हापासून हे विद्यार्थी ते साकार करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
युरोपियन ऑपेरा सारखा. .. गायानातून नाटक सादर करण्याची परंपरा..
महान संस्कृत कवी जयदेव यांच्या जीवनावरील काही प्रसंगातून हे गोविंदराव टेंबे यांनी ते लिहिले.
धर्म सत्ता आणि राजसत्ता याला न जुमानता कलाकाराने आपले स्वातंत्र्य जपणे.. सती प्रथेला विरोध, माणसातली आसुया..त्याचा परिणाम कलेवर कसा होतो.. या साऱ्याचे दर्शन या स्वरनाट्यतून होईल.
यात भिमपलास, पतदिप, मुलतानी, मारवा, श्री, पूरिया धनाश्री, पूरीया कल्याण, कल्याण, भूप, हमीर, केदार, छायानट, दुर्गा, शंकरा, बिहाग, बिहागडा, खांबावती, बागेश्री, मालगुंजी, मालकंस, चंद्रकंस, अडाणा, बहार, पुरिया, सोहनी, बसंत, ललत, जोगी, तोडी, देशकार, हींडोल, जोनपुरी ..हे राग त्या त्या पात्राच्या भावनेप्रमाणे इथे वापरले आहेत..हे या संगितिकेचे वैशिष्ठ्य आहे.
No comments:
Post a Comment