Monday, October 23, 2023

अनवट शांताबाई..

एकदा अनुभवल्याच पाहिजेत..
व्हायोलीनचे ते हळवे सूर सायंकाळचे हुरहूर लावणारे स्वर मंचावर वाजत रहातात..आणि त्यातच सुरू होते ..ही वाट दूर जाते.. ह्या सुरावटिकडे आणि शांता जनार्दन शेळके यांच्या जन्म गावपासूनचा प्रवास अभिवाचनातून उलगडला जातो..बालपण..तिथले वातावरण..मनावरचे आईचे ...आज्जीचे संस्कार ..आणि एका ज्येष्ठ कवियत्रीच्या जीवनाचा तो काहीसा उदास वाटणारा अनवट प्रवास वंदना बोकील.. कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्याच पुस्तकातून शांताबाई ज्या व्यक्त झाल्या आहेत..त्या हळूहळू आपली कहाणी सांगु लागतात.. अनुराधा जोशी..दिपाली दातार..आणि वंदना बोकील या त्या शब्दातून तर कधी कवितेच्या बोलितून व्यक्त होऊ लागतात.. आणि या साऱ्या प्रवासाला व्हायोलीनच्या पार्श्वसंगीतात आणि साजेशा गाण्याच्या स्वरात अनुप कुलथे त्या वातावरणात घेऊन जातात.. एकूणच रसिक शांताबाई शेळके यांच्या आयुष्यातील एकेक घटना एकाग्रतेने ऐकतात आणि त्या गोष्टीचा मागोवा घेत..त्यांच्या जीवनात एकरूप होऊन जातात.. शांता शेळके यांची गीते मना मनात..घराघरात पोचली पण त्यांच्या कविता तेव्हढ्या पोचल्या नाहीत.. ही खंत त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दूर करून त्यांच्याच पुस्तकातून त्यांनीच लिहलेल्या शब्दांना एकत्र करून वंदना बोकील यांनी आपली अनवट शांताबाई सादर केली..आपल्या आम्ही सुदर्शन रंगमच इथे हा अनुभव घेतला..या कार्यक्रमात सहभागी होऊन रसिकांना त्यात सामील करून वंदना बोकील. कुलकर्णी आम्हाला त्या दिवसात घेऊन गेल्या. शांता शेळके यांच्या मनातील व्यथा आणि त्यांचे ते एकाकी जगणे आणि त्यांच्या मनोव्यथा दर्शविणाऱ्या कविता निवडून लहानपण..घरगुती वातावरण..त्यांची जात.. त्यांचे शिक्षण .. त्यांनी मुंबईत जपलेले नाते आणि कवितेशी त्यांची जमलेली गट्टी सारेच इथे व्यक्त होते.. परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडली आहे त्याची ही कहाणी.. ओठांवरती थोडे हासू डोळा थोडे पाणी ठेऊन शब्दांच्या जोडीला इथे कविताही बोलक्या होतात..या अभिवाचानात बोलून न बोललेल्या भावनाही मनाला भिडतात त्याचे कारण प्रभावी व्यक्त होणे या सादर करणाऱ्या कलाकारांच्या भूमिकेतून..
त्याची परिणाकारकता इथे ऐकताना तुम्हालाही जाणवेल आणि तुम्ही सहजी त्या वातावरणात सामील होता. शब्दातून व्यक्त झालेल्या ओळीतून त्यांचे जगणे अंगावर येते..आणि आपण ज्या आनंदी आणि मनमोकळ्या भासलेल्या शांताबाई खरोखरीच कोणत्या उदासवाण्या आयुष्यात जगल्या त्याची ओळख होते.. कारुण्याचा स्पर्श या अनवट शांताबाई कार्यक्रमात सतत तुमची पाठ सोडत नाही.. आणि मग शेवटी जेंव्हा असेन मी नसेन मी..ची ओळ येते तेंव्हा पर्यंत हाच आशावाद कायम राहतो..
खरे तर अशा कार्यक्रमावर थोडक्यात व्यक्त होणे ही परीक्षा असते..यासाठी त्यांच्या काही कविता यांचा संदर्भ घ्यायचा मोह टाळून सुदर्शनच्या मंचावर..उत्तम रसजी, वाचकांच्या साक्षीने अनुभवलेल्या शांताबाई..यावर व्यक्त होणे खूप कठीण आहे..तो अनुभव प्रत्यक्ष घेणे हेच उचित होईल. अश्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि ती अनुभूती मनात कायम ठेऊन त्यांचे स्मरण सतत ठेवावे असाच हा कार्यक्रम आहे.. चंद्र.. चांदण्या..फुले वेचून..त्यामागची कळ्यांची वेदना तुम्हाला जगायला अधिक शिकवेल हे नक्की..
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Friday, April 28, 2023

पर्यटकांचे सुख जपणारे अजित करंदीकर..! रत्नागिरीचे अमृत ट्रॅव्हल्सची निवड करणारे आम्ही पुणेरी ..पण ती निवड किती उत्तम होती याची पारख आम्ही काश्मीर आणि आसाम, मेघालय अरुणाचल येथे जाऊन आल्यावर कळाले की ती किती उत्तम होती... याचे एकमेव कारण म्हणजे या कंपनीचे संचालक अजित करंदीकर.. पैश्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येकाशी नाते जोडताना त्यांच्या सुखात समाधान मानणारे हे व्यक्तिमत्व. सहा फुटाची उंची असलेला..सैन्यदलात पंधरा वर्षे काम केल्याने तगडेपणा..भारदस्त देह..आनंदी आणि रुबाबदार चेहरा..सगळ्यांना समजून घेऊन शेवटी ठिक आहे..असे आवर्जून सांगणारा माणूस..सहजपणे इतरांवर प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व..अजित करंदीकर.. अमृता ट्रॅव्हल्स यांचे नाव आमच्या मैफल ग्रुपच्या एकांनी सुचविले आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो.. गेली २२ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता यांनी रत्नागिरीत त्या भागातील पर्यटकांसाठी आपलेपण जपणारी कंपनी काढून कोकणातून बाहेर पडण्यासाठीची नजर त्यांनी प्राप्त करून दिली..आणि आलेल्या लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले ते त्यांच्या उत्तम नियोजनबध्द आणि नेटक्या शिस्तशीर सहलीच्या माध्यमाने.. काश्मीर हा तसा वेगळा सुरक्षा असणारा अनोखा भाग आणि तर थ्री सिस्टर हा चायना सीमेवरच्या अतिथंडीतला १५ हजार उंचीवरचा भूप्रदेश..पण दोन्ही ठिकाणी अजित करंदीकर यांनी आम्हा साऱ्या पर्यटकांना जे जे नमूद केले त्या त्या ठिकाणी नेण्याची कसरत पूर्ण समाधानाने पार पाडली..आमच्या प्रत्येकाच्या आरोग्यास प्राधान्य देऊन..काय हवे नको ते साध्य करून दिले.. प्रसंगी आपल्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन घडविले.. ठरलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त एकाही पैशाची अधिक मागणी न करता जे जे तुमच्या मनात असेल ते सांगा मी ते पुरवितो.. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे..मी तिथे मिळाले तर नक्कीच देईन..असे सांगत प्रवाशांना आपलेसे करत आपुलकीचे नाते जपले.. व्यवसायापेक्षा नाती आणि माणुसकी सांभाळणारी ही अमृता ट्रॅव्हल्सची पताका का इतक्या सहजपणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली याचे दर्शन आम्हाला अजित करंदीकर यांच्या सहवासात घडले.. यापूर्वी असाच अनुभव अनुभव ट्रॅव्हल्स यांच्याकडून केलेल्या अरुण भट यांच्या सहलीत आला होता..त्यानंतर आम्ही नवीन सहल कंपनी शोधत होतो. जिथे उत्तम लक्ष दिले जाईल आणि आपल्याला समाधानाने फिरता येईल..ते उदाहरण आता नक्की झाले... अमृता ट्रॅव्हल्स..रत्नागिरी.. काश्मिरच्या सहलीत सिंधुदुर्ग, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी,मालगुंड येथील कोकणवासीय ओळखीचे झाले..थ्री सिस्टर सहलीत..पुणे, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरातील पर्यटक सहभागी झाले होते. थोडक्यात तुम्ही कुठलेही असलात तरी अजित आणि सौ. अमृता करंदीकर यांच्या बरोबर सामील होऊन तुमच्या फिरण्याचा आनंद सुरक्षित आणि समाधानाने घेऊ शकता असे हे विश्वासपूर्ण नाव आहे.. उदाहरण द्यायचे तर शिलाँग येथून बांगलादेश सीमेवरील उमेद नदी परीसरात वर जायचे होते..पण शिलाँग सोडले आणि रस्त्यावर मध्येच कळाले की मध्ये रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद आहे..मग सर्वांना बोलावून अजित सरांनी विचारले आपण पर्यायी रस्ता शोधून जाऊ. पण सुमारे १५० कि.मी. प्रवास वाढेल..आणि रात्री मुक्कामास उशीर होईल..असे सांगून आम्ही दुसऱ्या मार्गाने निघालो देखील..पण यामुळे खर्च वाढेल..ह्याची जाणीव होती...आम्ही शेवटच्या दिवशी त्या खर्चात आमची मदत देण्यास सारे तयार होते..पण करंदीकर यांनी ठामपणे सांगितले..तुमचे समाधान हे महत्वाचे आहे..माझा खर्च झाला खरा..तरीही मी फायद्यात आहे.. तुम्ही कुणीही काहीही द्यायची गरज नाही.. आणि त्यांनी तो विषय संपविला.. कुणाही सहभागी मंडळींनी खिशातून एकही पैसा काढायचा नाही..आणि तसा खर्च केला तर मला सांगा आणि ते माझ्याकडुन मागून घ्या.. केवळ हा भाग नाही.. तर काश्मीर येथे शक्य नव्हते पण थ्री सिस्टर येथे बरोबर स्वयंपाकी होते.. प्रत्येक ठिकाणी रोज वेगळा मेनू.. चवदार..आणि उत्तम. रोज वेगळे गोड.. ताक शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा..भरपूर..आणि अगत्याचे दर्शन.. इतरांबरोबर स्वतःही या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यातील एक बनून वावरणे हे अजित सरांचे वैशिष्ठ्य. मालक असल्याचा आविर्भाव न बाळगता..सर्वांना आपलेसे करून उत्तम ते ते दाखविण्यास सतत तयार असलेले अजित सर मनात कायम कोरले गेले..त्यांच्या बरोबर आम्ही सुमारे २० दिवस घालविले . त्या आठवणी आम्ही नेहमीच जवळ ठेऊ आणि त्यांच्याबरोबर सहली करण्यास इतरांना सांगू .. अजित करंदीकर.. तुम्ही आम्हाला आनंद आणि समाधान दिलेत..असेच प्रेम कायम राहो हीच मनोमनी प्रार्थना.. अमृता ट्रॅव्हल्स जेंव्हा २५ वर्षाची होईल तेंव्हा

पर्यटकांचे सुख जपणारे अजित करंदीकर. रत्नागिरीचे अमृता ट्रॅव्हल्सची निवड करणारे आम्ही पुणेरी ..पण ती निवड किती उत्तम होती याची पारख आम्ही काश्मीर आणि आसाम, मेघालय अरुणाचल येथे जाऊन आल्यावर कळाले की ती किती उत्तम होती... याचे एकमेव कारण म्हणजे या कंपनीचे संचालक अजित करंदीकर.. पैश्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येकाशी नाते जोडताना त्यांच्या सुखात समाधान मानणारे हे व्यक्तिमत्व. सहा फुटाची उंची असलेला..सैन्यदलात पंधरा वर्षे काम केल्याने तगडेपणा..भारदस्त देह..आनंदी आणि रुबाबदार चेहरा..सगळ्यांना समजून घेऊन शेवटी ठिक आहे..असे आवर्जून सांगणारा माणूस..सहजपणे इतरांवर प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व..अजित करंदीकर.. अमृता ट्रॅव्हल्स यांचे नाव आमच्या मैफल ग्रुपच्या एकांनी सुचविले आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो.. गेली २२ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता यांनी रत्नागिरीत त्या भागातील पर्यटकांसाठी आपलेपण जपणारी कंपनी काढून कोकणातून बाहेर पडण्यासाठीची नजर त्यांनी प्राप्त करून दिली..आणि आलेल्या लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले ते त्यांच्या उत्तम नियोजनबध्द आणि नेटक्या शिस्तशीर सहलीच्या माध्यमाने.. काश्मीर हा तसा वेगळा सुरक्षा असणारा अनोखा भाग आणि तर थ्री सिस्टर हा चायना सीमेवरच्या अतिथंडीतला १५ हजार उंचीवरचा भूप्रदेश..पण दोन्ही ठिकाणी अजित करंदीकर यांनी आम्हा साऱ्या पर्यटकांना जे जे नमूद केले त्या त्या ठिकाणी नेण्याची कसरत पूर्ण समाधानाने पार पाडली..आमच्या प्रत्येकाच्या आरोग्यास प्राधान्य देऊन..काय हवे नको ते साध्य करून दिले.. प्रसंगी आपल्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन घडविले.. ठरलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त एकाही पैशाची अधिक मागणी न करता जे जे तुमच्या मनात असेल ते सांगा मी ते पुरवितो.. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे..मी तिथे मिळाले तर नक्कीच देईन..असे सांगत प्रवाशांना आपलेसे करत आपुलकीचे नाते जपले.. व्यवसायापेक्षा नाती आणि माणुसकी सांभाळणारी ही अमृता ट्रॅव्हल्सची पताका का इतक्या सहजपणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली याचे दर्शन आम्हाला अजित करंदीकर यांच्या सहवासात घडले.. यापूर्वी असाच अनुभव अनुभव ट्रॅव्हल्स यांच्याकडून केलेल्या अरुण भट यांच्या सहलीत आला होता..त्यानंतर आम्ही नवीन सहल कंपनी शोधत होतो. जिथे उत्तम लक्ष दिले जाईल आणि आपल्याला समाधानाने फिरता येईल..ते उदाहरण आता नक्की झाले... अमृता ट्रॅव्हल्स..रत्नागिरी.. काश्मिरच्या सहलीत सिंधुदुर्ग, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी,मालगुंड येथील कोकणवासीय ओळखीचे झाले..थ्री सिस्टर सहलीत..पुणे, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरातील पर्यटक सहभागी झाले होते. थोडक्यात तुम्ही कुठलेही असलात तरी अजित आणि सौ. अमृता करंदीकर यांच्या बरोबर सामील होऊन तुमच्या फिरण्याचा आनंद सुरक्षित आणि समाधानाने घेऊ शकता असे हे विश्वासपूर्ण नाव आहे.. उदाहरण द्यायचे तर शिलाँग येथून बांगलादेश सीमेवरील उमेद नदी परीसरात वर जायचे होते..पण शिलाँग सोडले आणि रस्त्यावर मध्येच कळाले की मध्ये रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद आहे..मग सर्वांना बोलावून अजित सरांनी विचारले आपण पर्यायी रस्ता शोधून जाऊ. पण सुमारे १५० कि.मी. प्रवास वाढेल..आणि रात्री मुक्कामास उशीर होईल..असे सांगून आम्ही दुसऱ्या मार्गाने निघालो देखील..पण यामुळे खर्च वाढेल..ह्याची जाणीव होती...आम्ही शेवटच्या दिवशी त्या खर्चात आमची मदत देण्यास सारे तयार होते..पण करंदीकर यांनी ठामपणे सांगितले..तुमचे समाधान हे महत्वाचे आहे..माझा खर्च झाला खरा..तरीही मी फायद्यात आहे.. तुम्ही कुणीही काहीही द्यायची गरज नाही.. आणि त्यांनी तो विषय संपविला.. कुणाही सहभागी मंडळींनी खिशातून एकही पैसा काढायचा नाही..आणि तसा खर्च केला तर मला सांगा आणि ते माझ्याकडुन मागून घ्या.. केवळ हा भाग नाही.. तर काश्मीर येथे शक्य नव्हते पण थ्री सिस्टर येथे बरोबर स्वयंपाकी होते.. प्रत्येक ठिकाणी रोज वेगळा मेनू.. चवदार..आणि उत्तम. रोज वेगळे गोड.. ताक शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा..भरपूर..आणि अगत्याचे दर्शन.. इतरांबरोबर स्वतःही या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यातील एक बनून वावरणे हे अजित सरांचे वैशिष्ठ्य. मालक असल्याचा आविर्भाव न बाळगता..सर्वांना आपलेसे करून उत्तम ते ते दाखविण्यास सतत तयार असलेले अजित सर मनात कायम कोरले गेले..त्यांच्या बरोबर आम्ही सुमारे २० दिवस घालविले . त्या आठवणी आम्ही नेहमीच जवळ ठेऊ आणि त्यांच्याबरोबर सहली करण्यास इतरांना सांगू .. अजित करंदीकर.. तुम्ही आम्हाला आनंद आणि समाधान दिलेत..असेच प्रेम कायम राहो हीच मनोमनी प्रार्थना.. अमृता ट्रॅव्हल्स जेंव्हा २५ वर्षाची होईल तेंव्हा जरूर रत्नागिरीत येऊ.. तुमचाच, सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे ९५५२५९६२७६ मला अजित करंदीकर यांची जाहिरात करायची नाही..पण अनेकांनी त्यांचा नंबर मागितला आहे म्हणून नंबर दिला आहे...9423053691